नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

New News - July 2013

साध्या पद्धतीने अभ्यास केल्यास यश मिळविणे सोपे- सुवर्णा उमाप (पोलिस उपनिरीक्षक)
आयुष्यात यश संपादन करायचे असेल प्रथम आपण आपल्या कर्तव्याशी व आभास्याशी एकनिष्ठ आवश्यक आहे, अभ्यासाबाबत उगीच बाऊ न बनवता सरळ साध्या पद्धतीने अभ्यास केल्यास यश संपादन केल्यास सोपे आहे. सोक्रेटीस यांनी सांगितल्या प्रमाणे माणसांना जशी श्वासाची गरज असते त्याच प्रमाणे आपण ध्यासाने झपाटले गेलो पाहिजेत. सातत्य, प्रामाणिकपणा, खिलाडू वृत्ती, नियोजन आणि कौटुंबिक आधार हेच खरे गमक असून हे साध्य झाल्यास यशाचा हिमालय सर करणे अवघड नाही स्पर्धा परीक्षेकडे संधी म्हणून पहा, सकारात्मक विचारच आपणाला यशाकडे खेचून घेईल असे मत नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या सुवर्णा उमाप यांनी व्यक्त केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा न्यायालय भरती लघु-टंकलेखक / कनिष्ठ-लिपिक / शिपाई पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर
राज्यातील जिल्हा न्यायालय भरतीसाठी लघु-टंकलेखक कनिष्ठ- लिपिक शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांनी खालील लिंक्सवरून डाऊनलोड करून घ्यावी.
http://103.23.150.156/shortlist/shortlist.html
------------------------------------------------------------------------------------------------------------
उच्च न्यायालय, औरंगाबाद शिपाई पदासाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
न्यायालयीन भरतीसाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी शनिवार, दिनांक ३/८/२०१३ रोजी सकाळी ११:०० वाजता उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. तसेच न्यायालयीन भरतीसाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद शिपाई पदासाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अवैध ठरविण्यात आलेल्या कारणासह जाहीर करण्यात आली असून उमेदवारांनी सोबतच्या लिंक्सवरून डाऊनलोड करून घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय डाकघर मधील पोस्टल असिस्टन्स परीक्षांचा निकाल जाहीर
भारतीय डाकघर मधील पोस्टल असिस्टन्स च्या झालेल्या पहिल्या पेपरच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिलनाडु आणि केरल विभागातील पात्र उमेदवारांना Computer Typing / Data Entry (PAPER II) परीक्षांची तारीख १० व ११ ऑगस्ट २०१३ ही ठरविण्यात आली असून सदरील हॉल-तिकीट पाठविण्यात आले असून ३१ जुलै २०१३ पर्यंत न मिळाल्यास उमेदवारांनी १ ऑगस्ट २०१३ पासून डाऊनलोड करून घ्यावीत.
अधिक माहिती http://www.eonlineapply.com/dop/doc/Res_24.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------
सावधान!!
आता नौकरीच्या ही बोगस जाहिराती, उमेदवारांनी प्रत्येक जाहिरातींची प्रथम खात्री करणे आवश्यक
राज्यात मोठ्या प्रमाणात नोकर भरती चालू असून यामध्येही बोगस जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगारांची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न होत असून बेरोजगारांनी अशा बोगस जाहिराती पासून दक्ष राहण्याची गरज आहे व प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक जाहिरातींची खात्री करूनच अर्ज करावेत व आपली होणारी फसवणूक टाळली पाहिजे. सध्या अशीच एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांचे नावाने नुकतीच भुसावळ, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यात कुशल कामगार भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून सदरील जाहिराती मध्ये सफाईदार ४८५३ पदे व आय टी आय साठी ६६४९ पदे असे एकून ११५०२ जागा भरण्याबद्दल असून विशेष म्हणजे स्वतंत्र व्यवसाय शिक्षण मंडळ किंवा सेवायोजन विभाग असताना सदरील तांत्रिक स्वरुपाची ची पदे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला भरण्याची गरजच काय? भरती जाहिरात प्रसिद्ध कधी व कुठल्या वृत्तपत्राला प्रसिद्ध झाली? डिमांड ड्राफ्ट शिक्षण मंडळाच्या नावे नाहीत? वास्तविक मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे आहे मात्र अर्ज व परीक्षा फीस धनाकर्ष (डी.डी.) स्वरुपात नव्हे तर पोस्टल ओर्डर स्वरुपात ५००,४००,३००,१०० या प्रमाणे मुंबई च्या पत्त्यावर का मागविले आहेत? वास्तविक मंडळाचे संकेत स्थळ www.msbshse.ac.in असे आहे परंतु जाहिराती मध्ये www.maharashtraboardstate.com असा उल्लेख केलेला आहे? तसेच अर्ज करण्यासाठी तब्बल दोन महिने म्हणजे २३ ऑगस्ट २०१३ पर्यंत अवधी दिला आहे? एक न अनेक बाबी यात शंकास्पद असल्या कारणाने सदरील जाहिरात ही पूर्णपणे बोगस असल्याचे दिसून येते त्यामुळे उमेदवारांनी अशा जाहिराती पासून वेळीच सावधानता बाळगून आपले नुकसान टाळले पाहिजे व शिक्षण मंडळाने याचा खुलासा केला पाहिजे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पी.एस.आय. परीक्षेत नांदेडचा शिवराज थडवे पहिला, कोल्हापूरचा विकास सुरवसे दुसरा व
बीडचा अमोल ढाकणे राज्यात तिसरा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी ६०० जागांसाठी घेतलेल्या फौजदारपदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून या परीक्षेत नांदेड येथील शिवराज बाबूराव थडवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून कोल्हापूर येथील विकास विलासराव सुरवसे यांचा दुसरा; तर बीड जिल्ह्यातील अमोल ज्ञानदेव ढाकणे यांचा तिसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील कविता दशरथ टोणगे यांचा महिलांमध्ये पहिला क्रमांक आला असून या परीक्षेतून १६७ महिलांची तर अनुसूचित जातीतील ९२ उमेदवारांची व अनुसूचित जमातीतील ४६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे तसेच पुणे विभागातून २५७ औरंगाबादमधून १०३, नाशिक १३३, मुंबई ३८, अमरावती ४७ आणि नागपूर विभागातून २२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेस उपस्थित राहिलेल्या एक १९,६,६१ उमेदवारांमधून ६०० जागांसाठी निवड करण्यात आली.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांसाठी उमेदवारांना आता नव्याने प्रोफाईल तयार करणे आवश्यक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीचा वास्ट इंडिया कंपनीने अगदी बोजवारा उडविल्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची व्यवस्था बदलून आता आयोगाने महाऑनलाईन यांच्याकडे दिली असून यास्तव उमेदवारांना आपली प्रोफाईल नव्याने तयार करणे आवश्यक असून नव्याने प्रोफाईल तयार केल्याखेरीज उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांसाठी अर्ज करता येणार नाही तसेच आयोगाने नव्याने जाहिराती प्रकाशित करणे चालू केले असून P.S.I. / S.T.I. सारख्या मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच उमेदवारांच्या प्रोफाईल एकाच वेळी तयार करताना सर्वर नक्कीच जाम होणार असा अनुभव आहे व नंतर होणारी अडचण लक्षात घेऊन उमेदवारांनी आपल्या प्रोफाईल तयार करण्यास हरकत नाही. आम्ही उमेदवारांच्या मदतीसाठी तालुकावार मदत केंद्र नियुक्त केले / केले जात असून उमेदवारांना त्या केंद्रांची मदत घेता येईल तसेच जेथे आमचे मदत केंद्र नसेल तेथे नव्याने देण्याचे काम चालू असून इच्छुकांनी ९४२२७४४८५१ वर संपर्क साधावा.
Download
------------------------------------------------------------------------------------------------------------
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०१३ ची प्रवेश सूचना
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०१३ सत्राचे प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी २४ जून २०१३ ते ८ जुलै २०१३ या दरम्यान सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बीड येथे २८ जून रोजी नौकरी महात्सवाचे आयोजन, उमेदवारांना सुवर्ण संधी
बीड येथे नौकरी महात्सव चे आयोजन करण्यात आले असून या मध्ये शिका व कमवा या योजने अंतर्गत शिक्षणासाठी कंपनीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असून या मध्ये विद्यार्थ्यांना तीन ते चार वर्षात म्यकेनिकल इंजिनिअर व इलेक्ट्रोनिक इंजिनिअर ची पदवी चे शिक्षण करून घेता येईल व यासाठी लागणारा खर्च कंपनीद्वारे केला जाईल. यासाठी एस.एस.सी. पास / नापास , एच.एस.सी. पास / नापास किंवा एम.सी.वि.सी./ आय. टी. आय. असि असून उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्ष असून उमेदवारांना स्टायपेंड प्रत्येक महिन्याला किमान रुपये ५००० मिळणार असून उपहार गृह व बस सुविधा कंपनी नुसार मिळतील. सदरील नौकरी महोत्सव शुक्रवार २८ जून २०१३ रोजी समर्थ मंगल कार्यालय, नगर रोड, बीड येथे उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तसेच पूर्व नोंदणीसाठी २८ जून २०१३ पूर्वी 9923821177 वर संपर्क साधावा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने लाइव टी.वी. प्रक्षेपण
महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने बदल होत असून याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने आम्ही दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने लाइव टी.वी. प्रक्षेपण देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अधिक माहिती http://maharashtratimes.indiatimes.com/livetv/14119699.cms या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.