नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

लष्करात विविध पदांसाठी भरती

लष्करात विविध पदांसाठी भरती



















कोल्हापूरच्या टेंबलाई हिल येथील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने येत्या ४ ते १० जानेवारी २०१४ सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह गोवा राज्यातील उत्तर आणि दक्षिण भागासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. ही भरती कवठेमहांकाळ सहकारी साखर कारखाना, जि. सांगली येथील मैदानावर होणार असल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले.

या भरतीचा कार्यक्रम
(१) दिनांक-४ जानेवारी-शनिवार , जिल्हा-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्नि्कल, सोल्जर टेक्निलकल एनए, सोल्जर क्लार्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(२) दिनांक-५ जानेवारी-रविवार, जिल्हा-सोलापूर, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निरकल, सोल्जर टेक्नितकल एनए, सोल्जर क्लार्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(३) दिनांक- ६ जानेवारी- सोमवार, जिल्हा- कोल्हापूर, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निककल, सोल्जर टेक्नितकल एनए, सोल्जर क्लार्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(४) दिनांक- ७ जानेवारी-मंगळवार, राज्य-गोवा, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निककल, सोल्जर टेक्नितकल एनए, सोल्जर क्लार्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील. याच दिवशी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यासाठी हवालदार एज्युकेशन भरती होईल. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(५) दिनांक-८ जानेवारी-बुधवार, जिल्हा-सातारा, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निककल, सोल्जर टेक्नि कल एनए, सोल्जर क्लार्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(६) दिनांक-९ जानेवारी-गुरुवार, जिल्हा-सांगली, पदे : सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निरकल, सोल्जर टेक्नि कल एनए, सोल्जर क्ला्र्क-एसकेटी. यावेळी एनसीसी प्रमाणपत्रधारक उपस्थित राहू शकतील.

(७) दिनांक-१० जानेवारी-शुक्रवार, जिल्हा : महाराष्ट्रातील वरील सर्व जिल्हे आणि गोवा राज्य, पदे : लष्करात कार्यरत असणाऱ्यांची मुले, निवृत्त कर्मचाऱ्यांची मुले, युद्धविधवांची मुले, विधवांची मुले आणि खेळाडू.

भरती प्रक्रियेच्या सूचना
- भरती प्रक्रिया पहाटे बरोबर ४ वाजता सुरु होईल.

- ज्या पदासाठी उमेदवार इच्छुक आहे, त्याच्या पात्रतेसाठी आवश्यलक ती कागदपत्रे सोबत असणे आवश्य>कच आहे.

- उमेदवाराच्या शरीरावर कृत्रिम टॅटू रंगवलेले आढळल्यास त्याला भरतीसाठी परवानगी नाकारण्यात येईल. नैसर्गिक टॅटू केवळ हाताचा कोपरा ते मनगटाच्या आतील चालू शकतील.

- भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. ती उमेदवारांच्या गुणवत्तेवरच होईल. त्यासाठी कोणाही एजंट अथवा मध्यस्थाने भरतीचे आमिष दाखवल्यास त्याची माहिती सैन्य अधिकारी किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात द्यावी.

अधिक माहितीसाठी शाखा सैन्य भरती कार्यालय, टेंबलाई हिल, पुणे-बंगळूर महामार्ग, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा ०२३१-२६०६४१९ वर संपर्क साधावा. असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे.