नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

NEWS


SSC Admit Card 2013 – CGL (Tier I) Exam 2013 Call Letter Download Now
Staff Selection Commission (SSC) has issued Call letter/Admit card for Common Graduate Level (Tier I) Exam 2013 which is going to be held on 14-04-2013 & 21-04-2013. Applied candidates can download their Admit Card at below link…
------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) भरती ऑनलाईन परीक्षांचे हॉल-टिकेट उपलब्ध.
महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मधील विविध पदे भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सदरील ऑनलाईन परीक्षांचे हॉल-टिकेट उपलब्ध झाले असून उमेदवारांनी सबंधित वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावेत.
अधिक माहिती http://ibpsreg.sifyitest.com/mhadamar13/login.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय डाकघर मधील पोस्टल असिस्टन्ट पदाची परीक्षा २१ एप्रिल २०१३ रोजी ...
भारतीय डाकघर तर्फे पोस्टल असिस्टन्ट पदाच्या भरतीसाठी २१ एप्रिल २०१३ रोजी परीक्षाचे आयोजन करण्यात आले असून सदरील परीक्षांचे हॉल-तिकीट पोस्टाने पाठविण्यात आले असून ६ एप्रिल २०१३ पर्यंत हॉल-तिकीट पोस्टाने न मिळाल्यास उमेदवारांनी ८ एप्रिल २०१३ नंतर डाऊनलोड करून घेता येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------
युपीएससीची परीक्षा आता मराठीतून देता येणार...
नवी दिल्ली- युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मराठीमध्ये देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लोकसभेमध्ये प्रादेशिक भाषांमधून ही परीक्षा देता येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. युपीएससीच्या परीक्षा इंग्रजीमधून देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ज्या परीक्षार्थींना मातृभाषेतून ही परीक्षा द्यायची होती, त्यांच्यावर अन्याय होईल अशी भूमिका महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध राज्यातील राजकीय पक्षांनी घेतली होती. या विरोधाला राजकीय यश आले असून लोकसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा काँग्रेसचे संसदीय कामकाज मंत्री व्ही नारायणसामी यांनी केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बीड 'तलाठी / लिपिक- टंकलेखक भरती- २०१२' निवड प्रक्रिया रद्द.
बीड जिल्हा निवड समितीच्या वतीने एप्रिल- २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या तलाठी व लिपिक भरती प्रक्रिया बद्दल विद्यार्थ्यांनी व विविध संघटनांनी घोडेबाजार झाल्याबद्दल आक्षेप घेतल्याने चौकशीअंती ही निवड प्रक्रिया रद्दबातल ठरविण्यात आली असून यावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे. काही दिवसापूर्वी राज्याच्या महसूल विभागाने सध्याचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना गोपनीय पत्र पाठवून या भरती बाबत जिल्हास्थरांवर निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या होत्या. या भरती बाबत जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी यापूर्वीच चौकशी करून या भरतीचा बेसच चुकल्याचे नोंदवून ती रद्द करण्यात यावी असे विभागीय आयुक्त व राज्याच्या महसूल विभागाला कळवले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल मान्य करावा कि अमान्य करावा व त्यासाठी काय करणे द्यावीत या पेचात राज्याचा महसूल विभाग सापडल्याने शेवटी महसूल सचिव, महसूल राज्यमंत्री आणी महसूल राज्यमंत्री यांनी यावर निर्णय घेण्याचे टाळून जिल्हाधिकारी यांनीच काय तो निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते या अनुसंघाने जिल्हाधिकाऱ्यांनी निवड समितीच्या सदस्याचे म्हणणे ऐकून घेवून ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचे ठरवले आहे.या भरतीसाठी राज्यातील सुमारे ८२०१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती यामध्ये तलाठी ५९ पदासाठी ५ हजार ९०२ व लिपिक-टंकलेखक ४६ पदांसाठी २२९९ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र शिपाई १२ पदांच्या भरती बाबत आक्षेप नसल्याने या जागा भरण्यात आलेल्या आहेत.