नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

जागा/भरती


  • ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ जागा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (२ जागा), योगा व निसर्गोपचार तज्ज्ञ (१ जागा), समन्वयक (३ जागा), मसाजिस्ट कम अटेंडंट (१ जागा), वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (८ जागा) ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. २८ फेब्रुवारी २०१२ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • कर्मचारी निवड मंडळातर्फे केंद्रीय पोलीस दलात २१९५ जागांसाठी भरती
कर्मचारी निवड मंडळातर्फे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक (१८५७ जागा) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सहायक उप निरीक्षक (३३८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ फेब्रुवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र राज्य हज समितीमध्ये १२ जागा
महाराष्ट्र राज्य हज समितीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर (८ जागा), लिपिक (१ जागा), हेल्पलाईन ऑपरेटर (१ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१२ आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात १३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयात उच्चस्तर लिपिक (१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • बँक ऑफ बडोदामध्ये परिविक्षाधीन अधिकारीच्या ६०० जागा
बँक ऑफ बडोदामध्ये परिविक्षाधीन अधिकारी (६०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१२ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दि. १५ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bankofbaroda.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.