Pages

सैन्यभरती मेळावा २०१३

19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावा
औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे 19 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार आहे. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.

कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे ४ ते ११ जानेवारी २०१४ दरम्यान आयोजन

कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन कवठेमहांकाळ येथे ४ ते ११ जानेवारी २०१४ या दरम्यान केले असून सोल्जर (जीडी) साठी दहावी पास, क्लार्क साठी बारावी ५०% मार्क, टेक्निकल/ नर्सिंग साठी बारावी विज्ञान आणि ट्रेडमन साठी आठवी, दहावी पास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस कवठेमहांकाळ, जि.सांगली येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.