- वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखकाच्या ६ जागा
मुंबईतील वास्तुशास्त्रीय संघटना निवड समितीतर्फे वास्तुशास्त्रीय आरेखक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १३ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषकाच्या ५० जागा
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयातील लेबर ब्युरोमध्ये अन्वेषक (५० जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवसाच्या आत पोचले पाहिजे. या संबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १८ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात ८२८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील गृहपाल (३८ जागा), भांडारपाल (६ जागा), कनिष्ठ लिपिक (५६ जागा), शिपाई (७ जागा), तसेच ठोक वेतनावरील मुख्याध्यापक (५६ जागा), सहाय्यक शिक्षक (४४३ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (१०० जागा), कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर (५६ जागा), सहाय्यक ग्रंथपाल (५६ जागा), शिपाई (११२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१२ आहे. अधिक माहिती http://
oasis.mkcl.org/DSW२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.