Pages

New Adds/जागा


  • कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ९९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे कोकण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात शिपाई (७६ जागा), रोपमळा मदतनीस (२३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता व दै. सकाळमध्ये दि. ७ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात १७ जागा
रत्नागिरी जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात जवान (१५ जागा), जवान नि वाहनचालक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती http:oasis.mkcl.org/excise या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ४ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • सातारा जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात ३९ जागा
सातारा जिल्हा निवडसमितीमार्फत अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जवान (३६ जागा), जवान नि वाहन चालक (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. http:oasis.mkcl.org/excise या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्थ व सांख्यिकी संचालनालयात २१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात मागासवर्ग अनुशेषाअंतर्गत संशोधन सहायक (३ जागा), सांख्यिकी सहायक (३ जागा), अन्वेषक (२ जागा),लिपिक टंकलेखक (२ जागा), वाहनचालक (७ जागा), चपराशी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://mahades.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत ६ जागा
शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेष भरती अंतर्गत लिपिक टंकलेखक (१ जागा), अस्तरणीकार (१ जागा), बांधणी साह्यकारी (२ जागा), प्रक्रिया साह्यकारी (१ जागा), मजूर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या ६०० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा २०१२ ची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे पोलीस उपनिरीक्षक (६०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. ७ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर ७५ जागा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपीक-नि-टंकलेखक (१९ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), तलाठी (४१ जागा), शिपाई (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१२ आहे. या संबंधीची जाहिरात व अर्जाचा नमुना http://www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • कोकण विभागीय कार्यालयात निम्नश्रेणी लघुलेखकाच्या १६ जागा
कोकण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक –निम्नश्रेणी (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.thane.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई व कनिष्ठ बांधणीकाराच्या १६ जागा
मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई व कनिष्ठ बांधणीकार (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती www.mumbaicity.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत महिला आरोग्य सेविका १०९५ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागात महिला आरोग्य सेविका (१०९५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. १२ मार्च ते १३ मार्च २०१२ या काळात होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळ, लोकमत मध्ये दि. २ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
  • एमपीएससीमार्फत लघुटंकलेखक व लघुलेखकांच्या २४६ जागांसाठी सरळसेवेद्वारे भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालय प्रशासकीय विभाग व इतर शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक – मराठी (२६ जागा), लघुटंकलेखक – इंग्रजी (५८ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक-मराठी (५६ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक-इंग्रजी (४१ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक-इंग्रजी (३५ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक-मराठी (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१२ आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्र वन विकास महामंडळात वन रक्षकाच्या 54 जागा
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या नाशिक विभागात वन रक्षक (54 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 27 फेब्रुवारी 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.